ग्रामीण महिलांना मुंबईत व्यासपीठ
राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात पालघर, पनवेल, कर्जत, पेण आणि जळगाव जिल्ह्यांतील एकूण 10 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. या गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्या, पौष्टिक लाडू, पारंपरिक तोरण, हस्तनिर्मित दागिने, जाम, जेली आणि ज्यूस यांचा समावेश आहे. तसेच, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज "तिरंगा" देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment