Friday, 22 August 2025

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे

 कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन
  • महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी

 

मुंबईदि. २१ :  कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकरमुख्य सचिव राजेश कुमारग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशीटाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटाजेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदालआयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्माजीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणनयांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi