Sunday, 31 August 2025

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

 महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

 

नवी दिल्लीदि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला तसेच संबंधित यंत्रणांना दिले.

 

ग्रामविकास मंत्री गोरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी निवासी आयुक्त यांनी प्रस्तावित केलेल्या बचतगट वस्तू प्रदर्शन व विक्री दालनबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच श्री. गोरे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.

 

महाराष्ट्र सदनात येत्या काळात बचतगटातील महिलांसाठी फिरते दालन उपलब्ध करून दिले जाईल. या दालनात गृहोपयोगी तसेच सजावटीच्या आणि वाळवणाच्या वस्तू यासह एक जिल्हा उत्पादनभौगोलिक मानांकन असणारे उत्पादन अशा वस्तू राहतील. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना राजधानीत व्यासपीठ उपलब्ध होईल असे श्रीमती विमला यांनी सांगितले.

 

ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली असून  स्वयं सहायता गटांचे दालन महाराष्ट्र सदनात सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित देखील केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi