Thursday, 7 August 2025

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीयनिमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 

मुंबईदि. ७ :  सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारीदि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारीदि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन  परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी  दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi