Monday, 4 August 2025

मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ या मोहिमेंतर्गत स्वच्छतेच्या कामांसाठी यांत्रिक उपकरणे, आधुनिक वाहने,

 उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले, ‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ या मोहिमेंतर्गत स्वच्छतेच्या कामांसाठी यांत्रिक उपकरणेआधुनिक वाहनेतसेच आपत्कालीन प्रतिसादासाठी स्वच्छता युनिट्स खरेदी करण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी नगरविकास विभागामार्फत केली जात असूनयासाठी रुपये ५०४ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सन २०२४२५ च्या पावसाळी अधिवेशनात रुपये १०० कोटी निधीची पुरवणी मागणी मंजूर करून ३१ मार्च २०२५ रोजी नगरविकास विभागास वितरित करण्यात आली आहे. गटारांची सफाई करण्यासाठी यांत्रिक उपकरणेस्वच्छता यंत्रसामग्रीरोबोटिक युनिट्स व आपत्कालीन वाहने यांची खरेदी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या वाहनाची देखभाल व दुरुस्ती ही तीन वर्षे संबंधित एजन्सीने करावी. तसेच एजन्सीने सफाई कामगारांना  वाहन चालवण्याबाबतचे प्रशिक्षण या कालावधीत द्यावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसास मोफत मालकी तत्वावर सदनिका प्रदान केल्या जातात. सध्या २५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी सेवा केलेल्या सफाई कामगारांना सदनिका दिल्या जातात. यामध्ये अटीत शिथीलतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi