Thursday, 7 August 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील

 ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

 

    मुंबई, दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये  रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.  

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनाआयुष्मान भारतराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमकिंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतीलतरमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

२० गंभीर आजारासाठी मदत

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरो प्रत्यारोपणहाताचे प्रत्यारोपणहिप रिप्लेसमेंटकर्करोग शस्त्रक्रियारस्ते अपघातलहान बालकांची शस्त्रक्रियामेंदूचे आजारहृदयरोगडायालिसिसकर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन)अस्थिबंधननवजात शिशुंचे आजारगुडघ्याचे प्रत्यारोपणबर्न (भाजलेले) रुग्णविद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi