Saturday, 30 August 2025

मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणार.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणार.

                                                            -   पालकमंत्री अॅड. आशिष शेलार

 

            मुंबईदि.30: आजच्या युगात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व आहे. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत खेळाडूंना देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई उपनगर जिल्ह्यात या वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अद्यावत क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारांच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असतील असे  मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागा अंतर्गत असणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर द्वारा  मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्त 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम उत्तर भारतीय संस्था हॉलबांद्रा पूर्व येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री  ॲड. आशिष शेलार   होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ काटियार,एन स्वामी रंगास्वामी (समर ऑलिंपिक खेळाडू) आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग खेळाडूश्री. विपुल घोष (द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित)उपस्थित होते.

            पालकमंत्री  अॅड. आशिष शेलार  यांनी विविध क्रीडा क्षेत्रामध्ये प्रविण्य प्राप्त खेळाडूंचे मुंबई उपनगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्याबद्दल विशेष आभार मानले.

या कार्यक्रमामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अशा 11 पुरुष आणि महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच पारंपरिक खेळाचा वारसा असलेल्या  दहीहंडी  खेळाच्या पथकांचे  पार्ले स्पोर्ट्स या महिला गोविंदा पथक (सात थरांचा विश्व विक्रम) कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक (दहा थरांचा  विश्व  विक्रम  )  यांचा सन्मान  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी योगा आणि दहीहंडी या खेळांची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली.

            जिल्हयातील क्रीडा यशाबाबत आणि विविध उपक्रमबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.  प्रस्तावना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर  यांनी केली. कार्यक्रमासाठी खेळाडू उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयाने विशेष प्रयत्न केले.

000

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi