Tuesday, 26 August 2025

मातृ वंदना योजना मुलीबद्दल सकारात्मक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहार देणेगरोदरपणात काम थांबल्यामुळे आर्थिक नुकसानीसाठी मजुरी भरपाई देणेदुसरे मूल हे मुलगी जन्मास आले असेल तर अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देऊन मुलीबद्दल सकारात्मक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलीच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढावा यासाठी गर्भधारणेच्या नोंदणीपासून सहा महिन्याच्या आत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी महिलेला ३ हजार रूपये देण्यात येतात. तर बाळाच्या जन्मानोंदणी नंतर दोन हजार रूपये देण्यात येतात. म्हणजेच पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रूपये देण्यात येतात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर सहा हजार रूपये देण्यात येतात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi