Wednesday, 27 August 2025

भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील

 ‘भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा 

लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील

लोकार्पणप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

 

मुंबई दि. २६ - तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागाने 'महाभूमीसंकेतस्थळावर 'भूमित्रया चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ही सेवा नागरिकांना महसुलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

भूमी अभिलेख विभागाने भूमी व्यवस्थापनाची माहिती अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरणमिळकत पत्रिका संगणकीकरणभूमी नकाशांचे संगणकीकरणतसेच भू-संदर्भिकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात विभाग यशस्वी झाला आहे. आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल असेही श्री.बावनकुळे म्हणाले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi