Thursday, 7 August 2025

दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 दृष्टिहीन मुलीआदिवासी विद्यार्थिनीबचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 

 मुंबई, दि.7 : दृष्टिहीन विद्यार्थिनीठाणेरायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीमुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरभालिवलीजिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनाही राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली.

            रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थिनीभगिनी व बांधवांनी गुरुवारी (दि. 7) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली व ओवाळले.

            यावेळी राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या.

राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेले ममता बाल सदन (बालगृह)कुंभारवळणमुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीमुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्यएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पशहापूर,जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पपेण (जिल्हा रायगड) येथील विद्यार्थींनीनॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)च्या येथील दृष्टिहीन विद्यार्थिनीप्रतीक्षा महिला बचत गटातील महिला यांचा समावेश होता.

भारत विकास परिषद, माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी व बांधवांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi