Thursday, 28 August 2025

महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन

 महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. २६ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरराष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेराष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाजाभिमुख कार्यात सहभागी करून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावता येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मानवतासहकार्यनेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात स्वच्छता अभियानवृक्षारोपणआरोग्य तपासणी शिबिरेसाक्षरता मोहिमारक्तदान शिबिरे यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समाजाशी थेट जोडणारी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी प्रभावी योजना आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi