उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाजाभिमुख कार्यात सहभागी करून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावता येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मानवता, सहकार्य, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, साक्षरता मोहिमा, रक्तदान शिबिरे यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समाजाशी थेट जोडणारी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी प्रभावी योजना आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले
No comments:
Post a Comment