Thursday, 7 August 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

महावस्त्र पैठणी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

 

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

देवगाव शनि ता. वैजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी हा कार्यक्रम झाला. जलसंपदा मंत्री (गोदावरीकृष्णा खोरे)राधाकृष्ण विखे-पाटीलजलसंपदा मंत्री (तापीविदर्भकोकण) गिरीश महाजन,आ. रमेश बोरनारे,आ. विठ्ठल लंघे, सुरेश चव्हाणकेजिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. वन नेशन वन प्रॉडक्ट या संकल्पनेंतर्गत जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठणी साडी या जिल्ह्यातील उत्पादनाला चालना दिली आहे. त्यादृष्टीने पैठण येथील उत्पादन असलेल्या पैठणी साडीबाबत सविस्तर माहिती या कॉफी टेबल बुकमध्ये देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

००००००

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi