Saturday, 9 August 2025

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

 उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

मुंबईदि. ७ : भारत निवडणूक आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना ७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे. ही अधिसूचना "राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा१९५२" च्या कलम ४ (१) आणि (४) अंतर्गत जारी करण्यात आली असून ती भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यानुसारनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ (सुट्टीचे दिवस वगळूनदररोज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत) असून नामांकन छाननी २२ ऑगस्ट २०२५सकाळी ११ वाजता करण्यात येईल. मतदानाची तारीख (जर गरज भासली तर): ९ सप्टेंबर २०२५सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत करण्यात येणार आहे.

त्याबरोबरनामांकनपत्र कक्ष क्र. RS-28पहिला मजलासंसद भवननवी दिल्ली येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दरम्यान स्वीकारण्यात येतील. त्याचबरोबर अनामत रक्कम रु. १५,०००/- रोख स्वरूपात किंवा रिझर्व्ह बँकेत/सरकारी कोषागारात जमा करता येऊ शकेल. नामांकनासोबत उमेदवाराच्या नावाची मतदार यादीतील अधिकृत नोंद असलेली प्रतअनामत रकमेची पावती आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती या पदाकरिताचे मतदान कक्ष क्र. F-101वसुधापहिला मजलासंसद भवननवी दिल्ली येथे होईल. ही निवडणूक राज्यसभा सचिवालयाचे महासचिव व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेअसे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi