Monday, 11 August 2025

उमेद मॉल’ मुळे महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण

 उमेद मॉल’ मुळे महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. 4 : राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावीयासाठी "उमेद मॉल" (जिल्हा विक्री केंद्रे) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असूनत्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार असून त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

"उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान" अंतर्गत हे मॉल कार्यान्वित होतील. हे अभियान ग्रामीण भागातील विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या मॉल्समुळे बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलाखाद्यपदार्थवस्त्रे व इतर उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठ मिळणार आहे. थेट विक्रीमुळे उत्पादकांना चांगला नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेलअसेही मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

विभागामार्फत प्रदर्शनेई-कॉमर्स पोर्टल (उमेद मार्ट) व प्रशिक्षण कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पद्धतीने या मॉल्समध्येही दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असूनस्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. "व्होकल फॉर लोकल" या पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळ देतया विक्री केंद्रांद्वारे स्थानिक उत्पादनांना ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी व्यासपीठ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये मॉल्स उभारले जातीलयाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. तसेच हा निर्णय ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला निश्चितपणे गती देणारा ठरेलअसा विश्वास मंत्री श्री. गोरे यांनी व्यक्त केला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi