Friday, 1 August 2025

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित कार्यक्रम

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित कार्यक्रम

§  महसूल सप्ताहअंतर्गत विविध उपक्रम

मुंबई, दि ११  : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दि.१ ते ७ ऑगस्ट२०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येणार आहे.

दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिनानिमित्त क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम करणान्या उत्कृष्ट अधिकारी  व कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे. तसेच महसूल सप्ताहात इतर दिवशी विविध कार्यक्रम तसेच उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजन करण्यात येणार आहे

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय/प्रभागनिहाय सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळण्याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच शिबीरामध्य नवमतदारांची नोंदणी करण्याकरिता देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जेष्ठ नागरिकदिव्यांग तसेच तृतीयपंथी यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण कर त्यांचेशी संबंधित संघटना व संस्थांशी चर्चा करून उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

याव्यतिरीक्त मुंबई शहरातील मिळकतपत्रिका ऑनलाईन करण्यात येत असून मिळाका पत्रिका वितरण करण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरून अधिक्षकभूमि अभिलेखमुंबई शहर यांचेमार्फत करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारीमुंबई शहर डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी कळविले आहे.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi