मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
नाशिक विभागातील 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाखांची मदत
मुंबई, दि. 4 :- राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाख 5 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची गरज उरलेली नाही. 20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते, त्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय 2–6 वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात, मेंदूचे आजार, हृदयरोग, बालकांची शस्त्रक्रिया, नवजात शिशुंचे आजार त्यासोबतच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रूग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते.
नाशिक विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 31 जुलै 2025)
जिल्हा | रुग्णसंख्या | मंजूर मदत रक्कम |
नाशिक | 1,039 | 10 कोटी 35 लाख 24 हजार |
जळगाव | 795 | 6 कोटी 99 लाख 45 हजार |
धुळे | 95 | 80 लाख 31 हजार |
नंदुरबार | 38 | 39 लाख 55 हजार |
अहिल्यानगर | 1,575 | 13 कोटी 77 लाख 50 हजार |
No comments:
Post a Comment