सियाल इंडिया 2025 मध्ये ‘उमेद’चा डंका
ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दालन खुले
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे
‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार
मुंबई, दि. २८ : - मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया 2025 या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहेत. ग्रामीण महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे.
या प्रदर्शनात १७ हून अधिक उत्पादने सादर करण्यात आली असून त्यामध्ये माढ्याचे डाळिंब, केळी, शेवगा; नाशिकचा लाल कांदा; धाराशिवच्या न्यूट्री शेवया; वायगावची GI हळद; देवगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा हापूस आंबा; साताराचे मिलेट कुकीज व घाण्यावरचे तेल; सोलापूरची मालदांडी ज्वारी; प्रसिद्ध इंद्रायणी व चिनूर तांदूळ; चारू तूरडाळ तसेच बाजरी, नाचणी व मिरचीसारखी उत्पादने विशेष आकर्षण ठरली.
No comments:
Post a Comment