शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती*
शेतकऱ्यांना 'हरित वीज' (ग्रीन एनर्जी) पुरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्याला वीज खरेदीत १० हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
राज्याच्या शाश्वत विकासासाठी 'ब्लू प्रिंट' तयार करण्यात आली असून, सध्या ५० टक्के वीज हरित स्रोतांतून निर्माण होते. पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील.
पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात 60 टक्के कृषी पंप बसविले आहेत तीन महिन्यात 3 लाख 86 हजार कृषी पंप बसवण्यात आले आहेत.यामुळे 23 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घराच्या छतावर 'सोलर रूफ टॉप' यंत्रणा बसवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ ३० लाख कुटुंबांना होणार असून वीजबिल भरावे लागणार नाही.
No comments:
Post a Comment