Saturday, 26 July 2025

कृषी औद्योगिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी मुलाखत

 कृषी औद्योगिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

डॉ. मंगेश गोंदावले यांची जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी मुलाखत

 

मुंबईदि. 26: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29 जुलै 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुकएक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खतेकिटकनाशकेकृषी अभियांत्रिकी उपकरणे व पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळामार्फत रासायनिक व जैविक किटकनाशकेबुरशीनाशकेतणनाशकेतसेच प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक यंत्रसामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षमसुरक्षित आणि शाश्वत होण्यास हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या योजनाउपक्रम व महामंडळाची कार्यपद्धती याविषयी डॉ. गोंदावले यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संवाद साधला आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi