बीड जिल्ह्यात २४ इमारतीसाठी ९ कोटी ४० लाख
बीड जिल्ह्यात सर्व सहा मतदारसंघात २४ इमारतीसाठी ९ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत, त्यांची विभागनिहाय संख्या पुढील प्रमाणे- मुंबई विभाग - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३, पुणे विभाग - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात १२५, नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात ५५, छत्रपती संभाजीनगर विभाग - छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ५१, लातूर विभाग- लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात ३९, अमरावती विभाग- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात ३८, नागपूर विभाग- नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात ३६ अशा एकूण ३२७ ठिकाणी नवीन इमारतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
०००
No comments:
Post a Comment