Monday, 7 July 2025

वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी 'कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासन सकारात्मक

 वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी

'कार्बन क्रेडिटदेण्याबाबत शासन सकारात्मक

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. ४ : समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अथवा वैयक्त‍िक जागेत कांदळवन आहेत. या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल. अशा जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणाकरिता कार्बन क्रेडिटदेण्याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतीलअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पालघर जिल्ह्यातील कांदाळवनांच्या अतिक्रमणाबाबत सदस्य स्नेहा दुबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरीसंजय केळकर राजेंद्र गावित यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याकांदळवनांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन विभागाकडे मॅग्रोव्ह सेल कार्यरत आहे. या सेलच्या माध्यमातून कांदळवन संवर्धनाचे काम होत आहे. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे ऱ्हास करून पर्यावरणाचा असमतोल निर्माण करणाऱ्या घटकांवर निश्चितच कारवाई केली जाईल. अशा १९ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेतअशी माहितीही पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi