Saturday, 19 July 2025

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल;,अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

 अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल;

पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला

अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

 

मुंबईदि. १९ अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री  मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या.

सी.टी.एस. क्रमांक १६१पहाडी गोरेगाव परिसरात झालेल्या पाहणीत आमदार श्री. परबपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्ष दर्शनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये होती. ती डेव्हलपमेंट झोन कशी झाली?, असा थेट सवाल करत श्रीमती मुंडे यांनी विभागाला जमीन नॉन डेव्हलपमेंट झोन असण्याची कारणे काय होती याचा तपशीलवार शोध घेण्याचे आदेश दिले.

जे कंत्राटदार बेकायदेशीर भरावासाठी जबाबदार आहेतत्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठिकाणी भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. कांदळवनाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याच्या तक्रारी लक्षात घेताअशा सर्व प्रकरणांचे संकलन करून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे प्रकार थांबायला हवेतपर्यावरणाच्या रक्षणासाठी यंत्रणांनी जलद गतीने काम केले पाहिजेअसे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi