मराठी भाषा केंद्र: सांस्कृतिक गौरव - मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी ‘जेएनयू’मधील मराठी अध्यासन केंद्राची स्थापना हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले. काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गाव, परदेशात मराठी बृहन् मंडळे निर्माण करणार असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक येथील विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण देत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘जेएनयू’मध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ सामंत यांनी यावेळी सांगितले.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी मराठी साहित्य, नाटक आणि कवितेचे महत्त्व विषद केले. प्रा. पंडित यांनी ‘सिंधुदुर्ग संवाद’ या राष्ट्रीय संवाद कार्यक्रमाची घोषणा केली आणि ‘जेएनयू’ समानता, गुणवत्ता आणि नाविन्यावर आधारित अग्रगण्य विद्यापीठ असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ५० भारतीय भाषांच्या अभ्यासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी मराठी विद्यार्थ्यांना ‘जेएनयू’मध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, धनंजय महाडिक, मेधा कुलकर्णी, हेमंत सावरा, अनिल बोंडे, अजित गोपछडे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यासह केंद्र शासनाचे विविध विभागातील अधिकारी, जेएन यू मधील प्राध्यापक आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment