नागपूर विभागातील शालार्थ लॉगिन गैरवापर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १ : नागपूर विभागात शालार्थ प्रणालीच्या लॉगिन आयडीचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपासणी पथक तसेच शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य अजय चौधरी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य नरेंद्र भोंडेकर, प्रशांत बंब, काशिनाथ दाते, प्रवीण दटके, सुरेश भोळे, मुफ्ती महोम्मद इस्माईल अब्दुल खालिक या सदस्यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येणार नाही. आतापर्यंत या प्रकरणात १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, संस्था चालक आणि संचालक यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment