जळगाव महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कामांचे आराखडे तयार करावेत
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १७ : जळगाव महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त उर्वरित रस्त्यांच्या कामांचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनास सूचना दिल्या जातील.निधी उपलब्धतेनुसार ही कामे सुरू केली जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले.
विधानसभा सदस्य सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.
उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, जळगाव महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामासाठी नगरोत्थान मधून १०० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून डांबरीकरणाच्या कामासाठी ४२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या कामांखेरीज उर्वरीत असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment