Wednesday, 23 July 2025

राजधानीत लोकमान्य टिळक जयंती दिनी अभिवादन

 राजधानीत लोकमान्य टिळक जयंती दिनी अभिवादन

नवी दिल्ली23 :  "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या घोषणेचे प्रणेतेथोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र. उपसंचालक मनिषा पिंगळेयांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलप्ते यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

यावेळी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi