अनुसूचित जमातीच्या सदोष प्रमाणपत्र तपासणी प्रकरणी तत्कालीन सह आयुक्तांवर
निलंबनाची कार्यवाही
- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक वुईके
मुंबई, दि. १८:- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे सदोष कार्यवाही करण्यात आली आहे. याप्रकरणी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजी नगरच्या तत्कालीन सह आयुक्त यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य राजेश पाडवी यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या तत्कालीन सह आयुक्त यांच्या कामकाजा संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य रामदास मसराम यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
आदिवासी विकास मंत्री श्री. वुईके यांनी सांगितले की, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजी नगरच्या तत्कालीन सह आयुक्त यांची विभागीय चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment