Thursday, 10 July 2025

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

 रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू

मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

                                        सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 10 : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राजकुमार बडोलेधर्मरावबाबा आत्रामनाना पटोले यांनी प्रश्न उत्तरेच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.

राज्यात कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते.  दुर्दैवानेउपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अ‍ॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यानआदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पपेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्तआदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच  या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे.  आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi