Tuesday, 1 July 2025

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार,कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ

 शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून

शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार

- कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ

 

मुंबईदि. १ : मानव विरहित शेती‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणेकाटेकोर सिंचन पद्धती विकसित करणेजिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणेशेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणेपीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरूनउत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दि. १ जुलै २०२५ रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनानिमत्ताने 'महाकृषी ए. आय. धोरण या विषयावरकृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वालप्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीकृषी आयुक्त सूरज मांढरेनानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यावेळी उपस्थित होते.

कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले कीशेतकऱ्यांच्या हिताच्या शासन अनेक योजना राबवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली जावी यासाठी महाकृषी ए. आय. धोरण शासन राबवत आहे. काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीतील उत्पादन वाढले आहे मात्र शेत मालाची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आव्हान आहे. फक्त भरमसाठ खत वापरणे हा जास्त उत्पादन देण्याचा मार्ग नाही. पिकाला जे आवश्यक तीच खतयोग्य पाणी याची  मात्रा  देणे आवश्यक आहे.

कृषीमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांना काळानुरुप प्रशिक्षण देणेनैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे. शेतकरी केंद्रित योजनाशाश्वत विकासच्या योजना राबवणे यावर शासन भर देत आहे. शेतमालाला योग्य हमी भाव मिळवून देणे हेच शासनाचे धोरण आहे असेही ॲड. कोकाटे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi