Wednesday, 2 July 2025

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित

 पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या

विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 

मुंबईदि. २ :- पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्याच्या विकासाची ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन आखावीत. नियोजित वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वयसंपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी वेळेत उपलब्ध होईल आणि चालू आर्थिक वर्षअखेर खर्च होईलयादृष्टीने कार्यवाही करावी. राज्याच्या विकासासाठी मिळणारा एक रुपयाचा निधीही परत जाणार नाहीयाची काळजी घ्याअसे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तनियोजन व उत्पादन शुल्क मंत्री श्री. अजित पवार यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. 1) भारतीय नौदलातून निवृत्त आयएनएस गुलदार जहाजाचा उपयोग करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यानजिक समुद्रात कृत्रिम प्रवाळ निर्माण करुन तिथे जागतिक दर्जाचे स्कुबा डायव्हिंगपाणबुडीचा अनुभवसमुद्रात पाण्याखाली संग्रहालय आदी पर्यटन सुविधांची निर्मिती2) नवी मुंबईत उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक युनिटी मॉलची उभारणी3) नाशिक येथे राम-काल-पथ’ ची निर्मिती आणि विकास4) राज्यातील ठाणेनागपूरनवी मुंबईछत्रपती संभाजीनगरपिंपरी चिंचवडकल्याण-डोंबिवलीसोलापूर या सात ठिकाणी नोकरदार महिलांसाठी वसतीगृहांची उभारणी5) नगरविकासग्रामविकासआपत्ती व्यवस्थापनसार्वजनिक आरोग्य आदी विभागांशी संबंधित विविध प्रकल्प आणि विकास योजना6) सांस्कृतिक वारसा जतन7) वने आणि वन्यजीव व्यवस्थापन8) रेवस-रेडी सागरी महामार्ग9) पोलिसांसाठी गृहनिर्माण योजना आदी कामांची प्रगतीत्यासाठी निधीची उपलब्धता यासारख्या बाबींचा आढावा घेऊन ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे पूर्ण होण्यातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. मात्र कामे वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. ती दर्जेदार असली पाहिजेतअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. त्याअनुषंगाने सूचनाही केल्या.

पंधराव्या वित्त आयोगातून होणारी ही सर्व विकासकामे पुढील शंभर वर्षांचे नियोजन करुन नियोजित वेळेत पूर्ण व्हावीतसर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. त्यांच्याशी समन्वयसंपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी चालू आर्थिक वर्षअखेर खर्च होईलयादृष्टीने कार्यवाही करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरानगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ताग्रामविकासचे प्रधान सचिव एकनाथ डवलेवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयनगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराजपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,  उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते,  वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव श्रीमती शैला ए.सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहनाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्रीसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi