Sunday, 20 July 2025

नवीन प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण

 नवीन प्रशासकीय इमारतीच्या

आराखड्याचे सादरीकरण

विधानभवनाची विस्तारीत इमारत होणार भव्यदिव्य

– विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

 

मुंबईदि. 16 :नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे व्हावेअसे विधानसभा अध्यक्ष अँड. राहूल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटीलसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी उपस्थित होते. वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याचे संकुल उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहिल याची काळजी घेण्यात येणार आहे. विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत सेंट्रल हॉलविधानसभाविधानपरिषद सभागृहमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीविधानसभा अध्यक्षविधानपरिषद सभापतीविरोधी पक्ष नेते यांचे दालन आदी असणार आहेत. तर शेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी वेगळी सहा मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच वाहनतळउपहारगृहअभ्यागत कक्षसुरक्षा कक्ष आदी सुविधा असणार आहेत. तसेच शासकीय मुद्रणालयाची जागा विधीमंडळास मिळाली असून या जागेवर मंत्रालयीन प्रशासकीय कार्यालयांसाठी सुमारे चार लाख चौ.फुटाची चौदा मजली भव्य दिव्य अशी इमारत उभारण्यात येणार आहे. विधानभवन परिसर व प्रस्तावित प्रशासकीय इमारत यांना भुयारी टनेलने जोडण्यात येणार आहे.

नागपूरमधील विधानभवनाच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाच्या मार्फत करण्यात येणार आहे. महामंडळाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

विधानभवनाचे विस्तारीकरण व नवीन इमारत बांधताना हरित इमारतीची संकल्पना राबविण्यात यावी. विधानभवनाच्या प्रस्तावित विस्तारीकरणामध्ये अभ्यांगतांसाठी पुरेशी जागा तसेच उपहारगृहाची सोय असावीअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi