कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात
किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न
- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १८ : राज्यातील ५ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना शासनाने तयार केली असून यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. लोढा बोलत होते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त स्टार्टअप असल्याचे सांगून कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, या स्टार्टअपना प्रोत्साहन देणे व त्यांचा व्यवसाय दीर्घकाळ चालण्याच्या दृष्टीने त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे धोरण ठरवण्यात येत आहे. ‘आय टी आय’ मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक, गोसेवा अशा स्वरूपाचे कोर्स सुरू करण्यात आल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment