नदीजोड प्रकल्प हा राज्यासाठी वरदान
सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १५ - राज्यातील दुष्काळी भागाला पाणी पोहचवण्याचा दृष्टीने नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प राज्यासाठी वरदान असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
राज्यात अनेक नदीजोड प्रकल्प सुरू असून वैनगंगा - नळगंगा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यासोबतच नार पार गिरणा, कोकणातील सावित्री, गोदावरीचे कोकण खोरे, उल्हास, वैतरणा तसेच तापी खोऱ्यातही अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्यातून कमी तसेच पाणी नसलेल्या नदी खोऱ्यात पाणी पोहचवण्याची शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
यासोबतच राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आहेत. अपूर्ण असणारे सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात येत आहे. तसेच तापी खोऱ्यामध्ये मेगा रिचार्ज प्रकल्प राबवण्यात येत असून यासाठी मध्य प्रदेश सरकार सोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे. बळीराजा योजना, प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment