भात पिकांच्या नुकसानीसंदर्भात अहवाल मिळताच पंचनामे करून नुकसान भरपाई
- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई दि. १८:- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांना शासन निकषानुसार मदत केली जाते. रायगड जिल्ह्यात भात पिकांच्या नुकसानीसंदर्भात अहवाल मिळताच पंचनामा करून शेतकऱ्यांना शासन निकषानुसार भरपाई दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले
विधानसभा सदस्य रवीशेठ पाटील यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात भात पीक नुकसान भरपाई मिळणे संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात पेरणी (धूळपेरणी) केली जाते. परंतु यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने भात पिकाची धूळपेरणी करणे शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत भात पिकाच्या रोपवाटिका करून भाताची लागण करण्यात आली. सध्या भात लागणी पूर्ण होत आली व सध्याचे भात पिके चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment