Wednesday, 23 July 2025

इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरातील औद्योगिक क्षेत्रास वाढीव जमीन देण्यास शासन सकारात्मक

 इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरातील औद्योगिक क्षेत्रास


वाढीव जमीन देण्यास शासन सकारात्मक


क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची आग्रही भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

 


मुंबई, दि. १६ : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील मिनी एमआयडीसी करिता सुमारे १५०० एकर जमीन देण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेलारासू, कृषी महामंडळाचे कार्यकारी संचालक नंदकुमार बेडसे, पुणे विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी पुणे डॉ.जितेंद्र डूडी यावेळी उपस्थित होते.


इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील जंक्शन हे महत्त्वाचे व लघुउद्योजकांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे विविध उपकरणे तयार करण्याचे काम उद्योजक करीत आहेत. येथील उद्योजकांचे गेल्या ४० वर्षांपासून एमआयडीसी सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे. ही मागणी मार्गी लावल्याने परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. याठिकाणी सर्व उद्योजकांनी एमआयडीसी करिता कृषी महामंडळाची जागा अधिकची मिळणे संदर्भातील मागणी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडे केली. यापूर्वी ३२८ एकर जमीन देण्याचे प्रस्तावित होते. मात्र भविष्याचा विचार करून किमान १,५०० एकर जमीन मिळावी अशी उद्योजकांची मागणी होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढीव जागेकरीता तत्काळ प्रतिसाद दिला. त्यामुळे एमआयडीसीचा प्रश्न लवकर सुटेल असा विश्वास मंत्री श्री. भरणे यांनी व्यक्त केला.


ही एमआयडीसी इंदापूर तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या एमआयडीसीमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे. इंदापूर तालुक्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे. नवउद्योजकांना नव्याने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच इंदापूर तालुक्याच्या परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सगळ्याच समाधान जनतेच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर मंत्री श्री. भरणे यांनी दिली आहे. यावेळी प्रताप पाटील, दत्तात्रय फडतरे, वसंत मोहोळकर, राजकुमार भोसले, संजय शिंदे, सचिन सपकळ, हर्षवर्धन गायकवाड, विष्णू माने, रामेश्वर माने, राहुल रणमोडे, मंगेश गांधी, केशव देसाई, जावेद मुलाणी, बाळासाहेब गोरे, विजय गावडे, प्रेम शेख, इन्नूस् मुलाणी, आबा माने यावेळी उपस्थित होते.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi