कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा
– मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १५ : कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी माध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबाडी पाणीपुरवठा योजनेऐवजी शिवना टाकळी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजना जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कन्नड शहराच्या नागरिकांसाठी वाढत्या गरजेनुसार योग्य व शाश्वत पाणीस्रोतांचा विचार करून, दोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
OOOO
No comments:
Post a Comment