Wednesday, 30 July 2025

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना

पोलीस पदक प्रदान

 

मुंबईदि. २९ : राज्यातील १०६ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदकउल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ व  २०२३ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२३ व  २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

सोहळ्यामध्ये ६४ पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आलेतर चार पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. तसेच ३८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदमपोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

सोहळ्यात प्रधान सचिव (विशेष) अनुप कुमार सिंहराज्य गुप्तवार्ता विभागातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमुखठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सेवा दिलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi