Wednesday, 30 July 2025

विले पार्ले येथील बेकायदेशीर संकुल बांधकामाची संयुक्त स्थळ पाहणी करावी

 विले पार्ले येथील बेकायदेशीर संकुल बांधकामाची संयुक्त स्थळ पाहणी करावी

- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबई, दि. ३० : मनुभारती सोसायटी के-पश्चिम वॉर्डविले पार्ले व शान कॉर्पोरेशन आणि सदगुरु बिल्डिंगके. एस. खांडेकर रोडपरांजपे ए स्कीमविले पार्ले (पूर्व) येथील संकुलातील बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत संबधित अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या समवेत संयुक्त पद्धतीने स्थळ पाहणी करावीअसे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

आझाद एम खान यांनी बेकायदेशीर बांधकाम व राज्याच्या महसूल नुकसानीबाबत तक्रार दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह आयुक्त (दक्षता) गंगाथरण् डी. अतिक्रमण निर्मूलन उपनगर मुंबई विभागाचे प्र.सहाय्यक अभियंता नितीन केणी व तक्रारदार आझाद एम खान व समशिर खान उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले कीया बैठकीत तक्रारदार आझाद एम. खान यांनी बेकायदेशीर बांधकामांमुळे राज्याच्या महसुलाला मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची बाब उपस्थित केली आहे. त्यानुसार बेकायदेशीर बांधकामांबाबत तक्रारदारांसोबत संयुक्त स्थळ पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा आणि त्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी सांगितले कीबेकायदेशीर बांधकामांबाबतची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महापालिकेच्या इमारत परवानगी विभागाकडे अधिकृतरीत्या अर्ज करावा. यामुळे पुढील कारवाई सुलभ होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi