Wednesday, 23 July 2025

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार

 नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना

 घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार

- मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. १० : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेलअशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावेयासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केली जाईलअशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 

नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होतात्यावेळी मंत्री श्री.देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य ज्ञानेश्वर म्हात्रेराजेश राठोडप्रसाद लाडॲड.अनिल परबसचिन अहिरहेमंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

 

मंत्री श्री.देसाई म्हणाले कीविविध शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एससीएसटीएनटीव डीटीमाजी सैनिककलाकारराज्य व केंद्र शासनाचे कर्मचारीअंध व दिव्यांग यांच्यासाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण आहे. 

 

शेवटीमराठी भाषिक नागरिकांना घर खरेदी करताना जर कुणी बांधकाम व्यावसायिक भेदभाव करत असेलतर राज्यशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेलअसे आश्वासन देसाई यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi