Thursday, 31 July 2025

बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत

 . बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसास मोफत मालकी तत्वावर सदनिका प्रदान केल्या जातात. सध्या २५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी सेवा केलेल्या सफाई कामगारांना सदनिका दिल्या जातात. यामध्ये अटीत शिथीलतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.

  लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांनी तात्काळ करावी. ज्या महानगरपालिका अथवा नगरपालिका याबाबत अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईलअसे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेचराज्यात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची संख्यायासंदर्भातील सविस्तर अहवाल प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका यांनी नगरविकास विभागास सादर करणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi