Tuesday, 22 July 2025

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जून - २०२५ चा मासिक व साप्ताहिक भव्य सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जून - २०२५ चा मासिक व साप्ताहिक

भव्य सोडतीचा निकाल जाहीर

मुंबईदि. २२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. जून-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १२,३४७ तिकिटांना  ७९ लाख ७१ हजार ८०० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५२,२७१  तिकीटांना रू. २ कोटी ०४ लाख ५ हजार ४०० ची बक्षिस जाहीर झाली आहेतअसे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे.

 माहे जून-२०२५ मध्ये ९ जून२०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री१३ जून२०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष२० जून,२०२५ महाराष्ट्र तेजस्विनी१८ जून२०२५ रोजी महाराष्ट्र गौरव२४ जून,२०२५ रोजी  महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या लॉटरी तिकिटांना जाहीर झालेले बक्षीस पुढीलप्रमाणे :-

महाराष्ट्र सह्याद्री  तिकीट क्रमांक MS-२५०६ E/२०८६९ या महाराजा असोसिएट्सइचलकरंलजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास  रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र तेजस्विनी TJ- ०६/४०१४ या विकास लॉटरी सेंटरअमळनेर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास  रक्कम रू. २५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ- ०६/९७४१ या किशोर लॉटरी सेंटरसांगली  यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.१४  लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ७ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi