चंद्रपूर जिल्ह्यातील मूल - मारोडा येथील
कृषी महाविद्यालयासाठी जागा लवकरच देणार
- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. १० : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल- मारोडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या इमारत बांधकामासाठी असलेली जागेची अडचण लवकरच सोडवण्यात येऊन येथे महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेमध्ये सदस्य नारायण कुचे यांनी सहभाग घेतला.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, कृषी विभागाच्या आकृतीबंध निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. या नवीन कृषी महाविद्यालयासाठी पदभरती दोन महिन्यात करण्यात येईल. महाविद्यालयाला देण्यात येणाऱ्या जमिनीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment