अनाथ मुलांच्या शैक्षणिक फी सवलत निर्णयाची
तत्काळ अंमलबजावणी करणार
- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे
मुंबई, दि. १७ : अनाथ मुलांसाठी शैक्षणिक फी व शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल, असे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम ९४ अन्वये विधानसभेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी अनाथ मुलांची, शासकीय नोकरीतील आरक्षण या विषयी विधानसभात्र अर्धा तास चर्चा उपस्थित केली. या चर्चेत सदस्य अमोल जावळे, सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले, बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन एसओपी केली जाईल. आणि पात्र लाभार्थी बालकांना याच लाभ मिळवून दिला जाईल.
०००००
No comments:
Post a Comment