Thursday, 17 July 2025

आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू

 आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर


 


मुंबई, दि. १७ : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्रशासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते. आता निधी प्राप्त झाला असून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले


विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


 राज्य शासनाकडील मानधन नियमित देण्यात येते. केंद्र शासनाकडून जानेवारी २०२५ पासूनचा निधी येणे प्रलंबित होते. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत मानधन वितरित झाले नाही. दिनांक ४ जून २०२५ रोजी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन वितरण प्रक्रिया सुरू आहे. या मानधना संदर्भात आर्थिक तरतूद उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi