Wednesday, 30 July 2025

दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशाखान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार

 दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. ३० :- राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावेया उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने खान अकॅडमी’ आणि श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराज्यमंत्री डॉ. पंकज भोयरराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालखान अकॅडमीच्या स्वाती वासुदेवनशोभना मित्तलश्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे प्रसन्ना प्रभू व मनीष बादियानी तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर डॉ.परदेशीशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओलशिक्षण आयुक्त  सचिंद्र प्रताप सिंहराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करणेत्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित करणे या दिशेने हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे." श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यातील १५० शाळांमध्ये आधुनिकअनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल. तर खान अकॅडमीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाने मराठी व इंग्रजी भाषांमध्ये दर्जेदार अध्ययन कार्यक्रम तयार केला जाणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यास मदत होईल व इतर शाळांनाही प्रेरणा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले कीश्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेने यापूर्वीही पाणी व्यवस्थापन व शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र शासनासोबत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग एक नवा आदर्श ठरेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi