महापालिका वसाहतीमधील सदनिका संदर्भात
उच्चस्तरीय समिती गठीत करणार
- उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 2 : महानगरपालिका हद्दीतील चेंबूर घाटला, मिठानगर, मालवणी, देवनार, पार्क साईट विक्रोळी, बर्वेनगर घाटकोपर या महापालिका वसाहतीमधील अनुज्ञा व अनुमती तत्वावर दिलेल्या बैठ्ठ्या खोल्या मालकी तत्वावर करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मच्याऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आला आहे. यासंदर्भात उच्च स्तरीय समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानससभेत सांगितले.
विधानसभा सदस्य तुकाराम काते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, सदनिकांवरील मालकी हक्क, न्यायालयीन आदेश आणि पुनर्वसन योजनेतील सहभाग अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीतकरून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री. सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
सदस्य सुनील प्रभू, सना मलिक, योगेश सागर हे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment