Tuesday, 15 July 2025

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाच्या यंत्रणा अधिक सक्षम करणार

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणेखते मिळण्यासाठी

कृषी विभागाच्या यंत्रणा अधिक सक्षम करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ९ :- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणेखते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईलयात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi