Saturday, 19 July 2025

मुंबई - अहमदाबाद रेल्वे मार्गाचे भूसंपादन नियमानुसार

 मुंबई - अहमदाबाद रेल्वे मार्गाचे भूसंपादन नियमानुसार

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

            मुंबईदि. १८:  मुंबई- अहमदाबाद या जलदगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.  त्यासाठी पालघर जिल्ह्यात  भूसंपादनही करण्यात येत आहे. हे भूसंपादन प्रचलित कायदे आणि नियमानुसार असून याबाबत कुठेही आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक होऊ दिली जाणार नाहीअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य राजेंद्र गावित यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणालेया रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा असे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल. याबाबत बैठकीचे आयोजनही करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi