Thursday, 24 July 2025

नागपूर शहरातील भूखंड 'फ्री होल्ड' करण्याबाबत शासन सकारात्मक

 नागपूर शहरातील भूखंड 'फ्री होल्डकरण्याबाबत शासन सकारात्मक

- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. १० : नागपूर शहरामध्ये नागपूर सुधार प्रन्यासच्या अंतर्गत असलेले ५५ हजार ७१९ भूखंड आहेत. या भूखंडांना ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त असून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.

नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यासचे भूखंड ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य कृष्णा खोपडे यांनी सहभाग घेतला.

उत्तरात अधिक माहिती देताना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्याभूखंड ‘फ्री होल्ड’ करताना रेडी रेकनर दराने १ हजार फुटापर्यंत दोन टक्के आणि १००० फुटाच्या वर पाच टक्के शुल्क लावून हे भूखंड फ्री होल्ड करण्यात येतील. यामुळे शासनाला महसूल मिळणार आहे. तसेच याबाबत निर्णय घेण्यातही नागपूर महापालिकानागपूर सुधार प्रन्यास व नागपूर प्रदेश महानगर विकास प्राधिकरण यांची संयुक्त बैठकही घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi